लातूर जिल्हा निर्मिती वर्धापन दिन : १६ अॉगस्ट २०१८

महाराष्ट्रात आज रोजी ३६ जिल्हे आहेत. परंतु १ मे १९६० ला संयुक्त महाराष्ट्र अस्तित्वात येताना २६ जिल्हेच होते. त्यानंतर प्रशासनाच्या सोयीसाठी, स्थानिक गरजा आणि आकांक्षांच्या पूर्ततेसाठी विविध प्रशासकीय विभागातून विविध मोठ्या जिल्ह्यांमधून नवीन जिल्ह्यांची निर्मिती झाली.

सर्वप्रथम औरंगाबाद जिल्ह्यातून जालना जिल्हा आणि रत्नागिरी जिल्ह्यातून सिंधुदुर्ग जिल्हा १ मे १९८१ रोजी अस्तित्वात आला.

त्यानंतर उस्मानाबाद मधून लातूर १६ ऑगस्ट १९८२ रोजी वेगळा झाला आणि चंद्रपूर मधून गडचिरोली २६ ऑगस्ट १९८२ वेगळा केला गेला.

त्यानंतर बृहमुंबई जिल्ह्यातून मुंबई उपनगर जिल्ह्याची निर्मिती ४ ऑक्टोंबर १९९० मधे झाली.

मग अकोला जिल्ह्यातून वाशिम (१ जुलै १९९८)
धुळे जिल्ह्यातुन नंदुरबार (१ जुलै १९९८)
परभणी जिल्ह्यातून हिंगोली (१ मे १९९९)
भंडारा जिल्ह्यातून गोंदिया (१ मे १९९९)

१ ऑगस्ट २०१४ पासून ठाण्यातून पालघर जिल्हा निर्माण झाला.

अशा पध्दतीने आणि क्रमाने महाराष्ट्राचा नकाशा बदलत गेला !

आज लातूर जिल्हा अस्तित्वात येऊन तब्बल ३६ वर्षं पूर्ण झाली !

समस्त लातूरकरांना जिल्हा निर्मिती वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा !

डॉ. अभिराज सूर्यवंशी

Leave a Reply